वडजी येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:16+5:302021-09-05T04:20:16+5:30
दीड महिन्यांपूर्वी भरचौकात असलेले महावीर प्रोव्हिजन या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून १ लाखावर रक्कमेची चोरी झाली आहे, तर दि. ...

वडजी येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी
दीड महिन्यांपूर्वी भरचौकात असलेले महावीर प्रोव्हिजन या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून १ लाखावर रक्कमेची चोरी झाली आहे, तर दि. ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीत नेमके त्या दिवशीच घरमालक इंदल आनंदा परदेशी व मधुकर पाटील बाहेरगावी गेले असल्याने चोरांनी संधी साधून त्यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घराच्या मुख्य दरवाजाची कडीकुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी या घरातील सर्वच कपाटे भांडी, सोफा, कॉट, घरातील कपडे अस्ताव्यस्त फेकल्याचे सकाळी लक्षात आले. या दोन्ही घरात कोणत्याच प्रकाराचा ऐवज व रोकड नसल्याने हानी टळली.
वडजी गावात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले असून नागरिक भयभीत झाले आहेत. तरी गावात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.