शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

अमळनेर तालुक्यात तीन गावात घरफोडी, दहा लाखांचा ऐवज लंपास करून चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 17:26 IST

अमळनेर : तालुक्यातील सावखेडा, रुंधाटी व मठगव्हान येथे चोरट्यांनी बंद घरांमध्ये धाडसी घरफोड्या करून १० लाखांचा ऐवज लंपास केला. ...

अमळनेर : तालुक्यातील सावखेडा, रुंधाटी व मठगव्हान येथे चोरट्यांनी बंद घरांमध्ये धाडसी घरफोड्या करून १० लाखांचा ऐवज लंपास केला. या घटना २७ रोजी पहाटे घडल्या. घटनास्थळी पोलीस अधिक्षकांनी भेट देऊन श्वानपथक मागवण्यात आले होते. दोन मोटरसायकलने चोरटे फरार झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे.याबाबत माहिती अशी, सावखेडा येथे गुलाबराव दगा कदम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील व डब्यातील ३५ ग्राम वजनाच्या एक लाख १२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, २ लाख ५६ हजारांची ८ तोळ्यांची माळ, २ लाख ७५ हजार रुपयांच्या ९ तोळ्यांच्या ८ अंगठ्या, ६४ हजार रुपयांची २ तोळे पोत, १६ हजार रुपयांचे ५ ग्राम कानातले, ७ हजार रोख असा एकूण ८ लाख १० हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. गुलाबराव यांचा एक मुलगा चोपडा येथे व एक अमळनेर येथे राहत असून ते औषधोपंचारासाठी आठ दिवसांपासून अमळनेरला आले होते. त्याचप्रमाणे रुंधाटी येथील दिलीप भाऊराव पाटील हे देखील धुळ्याला दवाखान्यात अ‍ॅडमिट होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रोख, सुमारे सव्वा लाखाची साडे तीन तोळ्यांची मंगलपोत व १० हजार रुपयांची २३ भार चांदी असा दीड लाखाचा माल चोरून नेला. मठगव्हान येथे जितेंद्र देवाजी पवार यांचे घर फोडून कपाटातील ४ हजार रुपये लंपास करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अमळनेरला राहणारे जितेंद्र पवार नेमके त्याचवेळी घरी परतल्यान पुढील चोरी टळली. आरडाओरड सुरू केली असता ग्रामस्थ जागे होऊन धावून आले. त्यावेळी चोरट्यांनी हातातील गिलोरने दगडफेक केली. त्यात हंसराज पवार व पप्पू पवार जखमी झाले. सहा चोरटे दोन मोटरसायकलींद्वारे फरार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी, श्वानपथक प्रमुख शेषराव राठोड, पोलीस नाईक शरद पाटील यांनी भेट दिली. श्वान पथकाने आरोपी मुंगसे सावखेडा मार्गे पळाल्याचे दर्शवले. मुंगसे ते सावखेडा दरम्यान आरोपीनी रस्त्यात चादर टाकून जेवण केल्याचा पुरावा आढळून आला. तेथे आढळलेल्या पिशवीवर धार, मध्यप्रदेश असा उल्लेख सापडल्याने आरोपी माध्यप्रदेशातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.