जळगाव - तालुक्यातील आव्हाणे येथील सरुआई नगरातील अजय गंगाराम सपकाळे व संजय दुल्लब येशी यांच्या घरात मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करत काही रोख रक्कम व दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आव्हाणे येथील अजय गंगाराम सपकाळे हे त्यांच्या आई,वडील यांच्यासह राहतात. सोमवारी रात्री विजेचा लपंडाव सुरु असल्याने घरातील सर्र्वजण गच्चीवर झोपले होते. ही संधी साधत चोरट्यांनी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सपकाळे यांच्या घरामागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. ४५० ग्रॅम चांदीचे दागिने, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, रोख पाच हजार रुपये व एक पाच हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला आहे.अजय सपकाळे यांच्या घरामधून ऐवज लंपास केल्यानंतर चोरट्यांनी संजय दुल्लब येशी यांच्या घराची कडी तोडून रोख एक हजार रुपये व एक मोबाईल लांबविला आहे. तसेच येशी यांच्या घरातील सामान देखील रस्त्यावर फे कून देण्यात आले होते.
जळगाव तालुक्यात दोन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:23 IST
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील सरुआई नगरातील अजय गंगाराम सपकाळे व संजय दुल्लब येशी यांच्या घरात मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करत काही रोख रक्कम व दागिने लंपास केले.
जळगाव तालुक्यात दोन ठिकाणी घरफोडी
ठळक मुद्देचोरट्यांनी लांबविले दागिने व पैसेगच्चीवर झोपले असता चोरट्यांनी साधला डावतालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल