शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

शेजारच्या घरांच्या कड्या लावून पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 5:33 PM

शेजारच्या व वरच्या मजल्यावरील घराच्या दरवाजाच्या कड्या लावून चोरट्यांनी पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात सागर सुरेश हिंगोणकर यांच्या बंद घराचे कुलुप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ५० हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे, मात्र गुन्हा दाखल झालेला नाही.

ठळक मुद्दे५० हजाराचा ऐवज लांबविला बंद घर चोरट्यांकडून टार्गेटघर मालकालाच कोंडले

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१  : शेजारच्या व वरच्या मजल्यावरील घराच्या दरवाजाच्या कड्या लावून चोरट्यांनी पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात सागर सुरेश हिंगोणकर यांच्या बंद घराचे कुलुप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ५० हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे, मात्र गुन्हा दाखल झालेला नाही.

खासगी इलेक्ट्रॉनिक्स टॉवरचे अभियंता असलेले सागर हिंगोणकर हे मुळचे अकोला येथील रहिवाशी आहे. नोकरीनिमित्त ते जळगावात स्थायिक झाले आहेत. योगेश आत्माराम पाटील यांच्या मालकीच्या गट क्र.३१५/१/१ च्या प्लॉट क्र.२७ मधील घरात भाड्याने राहतात. योगेश पाटील हे वरच्या मजल्यावर राहतात. पत्नी व मुलगी दिवाळीनिमित्त यवतमाळ येथे माहेरी गेल्या आहेत तर हिंगोणकर हे २५ दिवसापासून मुंबई येथे प्रशिक्षणाला गेलेले आहेत. त्यामुळे हे घर बंद होते.घर मालकालाच कोंडलेघर मालक योगेश पाटील हे वरच्या मजल्यावर राहतात. सकाळी त्यांचा मुलगा शाळेत जाणार असल्याने ते उठले असता घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता. त्यामुळे त्यांनी शेजारी राहणारे ईश्वर पाटील यांना फोन करुन दरवाजाची कडी उघडायला लावली. खाली हिंगोणकर यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तुटले होते तर बेडरुमध्येही दरवाजा उघडा होता. घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता. त्यामुळे त्यांनी सागर हिंगोणकर यांना मोबाईलवरुन घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ग्रॅमची अंगठी व दहा ग्रॅमचे पत्नीचे दागिने व १५ हजार रुपये रोख असा ऐवज कपाटात होता. हा ऐवज गायब झालेला होता. कपाट उघडे होते. नेमकी किती ऐवज गेला हे घर मालक घरी आल्यावर स्पष्ट होईल. दरम्यान, शेजारी राहणाºया आणखी दोन घरांच्या दरवाजाच्याही कड्या चोरट्यांनी लावल्या होत्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरमालक घरी नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही.