भडगाव येथे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 19:11 IST2019-03-08T19:10:10+5:302019-03-08T19:11:47+5:30
भडगाव शहरातील शिवाजीनगर संत सेना महाराज मंदिराजवळ ७ रोजी मध्य रात्री चोरट्यांनी गोविंदसिंग हिलाल पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरातील व्यक्तींना मारहाण करत दोन लाखांची जबरी चोरी केली व चोरटे पसार झाले.

भडगाव येथे घरफोडी
भडगाव : शहरातील शिवाजीनगर संत सेना महाराज मंदिराजवळ ७ रोजी मध्य रात्री चोरट्यांनी गोविंदसिंग हिलाल पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरातील व्यक्तींना मारहाण करत दोन लाखांची जबरी चोरी केली व चोरटे पसार झाले.
गुरुवारी मध्य रात्री गोविंदसिंग पाटील यांच्या घराच्या पुढील दरवाजाचा व आजूबाजूच्या घरांचेदेखील बाहेरून कडी लावले. यानंतर मागील दरवाजाची कडी तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश करुन हिंदीमधून ‘हम तुम्हे मारेंगे नही, जो तुम्हारे पास होंगा, निकाल दो’ असे म्हणत घरातील कपाटातील सामान फेकला. त्याला गोविंदसिंग यांनी प्रतिकार केला. तेव्हा एकाने डोक्यावर वार करून जखमी केले. कपाटातील रोख रक्कम, २२ ग्रॅम सोन्याची पोत, मणी मंगळसूत्र, पाच ग्रॅम कानातील सोन्याचे झुंबर व पाच ग्रॅम काप, पाच ग्रॅम अंगठी, चांदीच्या साखळ्या असे दोन लाख १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरुन नेला.
याबाबत सरिता गोविंदसिंग पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव करीत आहे.
घटनास्थळी चाळीसगाव अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय नाजिर शेख, पोलीस निरीक्षक धनजय येरुळे, पो.ना.लक्ष्मण पाटील, पो.ना.नितीन राउत, पो.काँ.समाधान पाटील, पो.काँ.ईश्वर पाटील तपास कामी भेट दिली. घटनास्थळी जळगावच्या श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. या घटनेने नागतिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.