शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथे शॉक लागल्याने बैलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 5:10 PM

विजेच्या शॉकने बैलाचा मृत्यू झाल्याची घटना लोंढ्री, ता.जामनेर येथे रविवारी दुपारी घडली. ट्रान्सफार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, बैलगाडीत बसलेल्या पाच जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले.

ठळक मुद्देपाच जणांचे वाचले प्राणवीजपुरवठा अर्ध्या तासाने बंदलाईनमचा हलगर्जीपणा बेतला शेतकऱ्याच्या जीवावर

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : विजेच्या शॉकने बैलाचा मृत्यू झाल्याची घटना लोंढ्री, ता.जामनेर येथे रविवारी दुपारी घडली. ट्रान्सफार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, बैलगाडीत बसलेल्या पाच जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले.सूत्रांनुसार, ईश्वर बाबूराव चौधरी हे बैलगाडी घेऊन घराकडे निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी छाया ईश्वर चौधरी, संगीता राजू सावकारे, राजू सावकारे व मजूर सोपान जगन चव्हाण असे चार जण होते. लोंढ्री गावाजवळील सहा नंबर ट्रान्सफार्मरच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असताना याची कल्पना चौधरी यांना आली नाही. बैलगाडी ट्रान्सफार्मरच्या परिसरातून जात होती. तेव्हा तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने बैलाला खेचले. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा बैल जखमी झाला. महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील अनिल राजाराम चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन महिलांना वाचविले तर ईश्वर चौधरी, राजू सावकारे व सोपान जगन चव्हाण यांनी उड्या मारून आपले प्राण वाचविले.रविवारी दुपारी पाऊस सुरू असताना ही घटना घडलीे. घटनेची माहिती मिळताच लोंढ्रीतील गावकऱ्यांनी घटनास्थळी जावून मदत केली आहे. लाईनमन भूषण खडके व नीलेश बोरसे यांना भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करून विद्युतप्रवाह बंद करण्यासाठी सूचना केली. तब्बल अर्ध्या तासाने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.घटनास्थळी कमलाकर पाटील, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे व गोपाल पाटील यांनी पाहणी केली आहे.दोन महिन्यांपासून शेतकºयांच्या तक्रारींकडे दुर्लक्षया ट्रान्सफार्मरच्या परिसरातील विद्युत तारांमध्ये नेहमी विद्युत प्रवाह दोन महिन्यांपासून सुरू आहे. याची तक्रार अनिल राजाराम चौधरी या शेतकºयाने लाईनमन भूषण खडके व नीलेश बोरसे यांच्याकडे केली आहे. पण या तक्रारीकडे यांनी दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली, असा आरोप अनिल चौधरी यांनी केला आहे. नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर