शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

जड मनाने घेतला बीएसएनएलच्या ४०० जणांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 12:20 PM

अडीच लाख ग्राहकांची जबाबदारी आता केवळ १५० कर्मचाऱ्यांवर

जळगाव : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून निवृत्ती पत्करण्यास सुरुवात केली आहे. ३१ जानेवारी रोजी एक दोन नव्हे तर तब्बल ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामध्ये वर्ग १ आणि २च्या २६ अधिकाºयांचा समावेश आहे. यापुढे केवळ १५० कर्मचाºयांना ५५० कर्मचाºयांचं काम करून ग्राहकांना सेवा पुरवावी लागणार आहे.बीएसएनएल कंपनीला गेल्या काही वर्षांमध्ये घरघर लागली आहे. आर्थिक अडचणीत सापडल्याने बीएसएनएलच्या कर्मचाºयांसमोर केंद्र सरकारने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवला. अनेक वर्षे कौटुंबिक वातावरण जपत, त्या कार्यालयात काम केले, ते कार्यालय डबघाईला आले म्हणून सोडून जाणे अनेक कर्मचाºयांना पटणारे नव्हते. मात्र केंद्र शासनाने याबाबत कडक धोरण अवलंबल्याने अनेक कर्मचाºयांनी जड मनाने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्विकारला.जळगाव जिल्ह्यात बीएसएनएलचे कर्मचारी व अधिकारी मिळून जवळपास ५५० लोक आहेत. त्यातील जवळपास ४०० लोकांनी ३१ जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली.कार्यालय आर्थिक डबघाईस आले असताना, कर्मचाºयांची समर्थपणे सेवा करायची तयारी असतानाही शासनाच्या आडमुठे धोरणामुळे ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवसात बीएसएनएलची साथ सोडली. यामध्ये वर्ग-१ आणि वर्ग-२च्या २६ कर्मचाºयांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात अविरतपणे लाखो कर्मचाºयांना सेवा देण्याचे अवघड काम आता अवघ्या १५० कर्मचाºयांना करावे लागणार आहे. या १५०पैकी २२ कर्मचारी टप्प्याटप्प्याने मे महिन्यापर्यंत वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत.अखेरच्या दिवशीही सायंकाळी उशिरापर्यंत सेवाहोय! नोकरीचा तो अखेरचा दिवस! पण कोठेही सत्कार समारंभ नव्हता वा निवृत्तीचा निरोप समारंभही नव्हता. उलट शहरात महामार्गाच्या कामामुळे आणि अमृत योजनेमुळे विस्कटलेली सेवेची घडी बसवण्यातच कर्मचारी ‘फिल्ड’वर सायंकाळी उशिरापर्यंत गुंग होते.कुटुंब विस्कटलं, न भरण्यासाठी!अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी निवृत्त होतात, स्वेच्छानिवृत्ती घेतात, त्याठिकाणी नव्याने कर्मचारी नियुक्त केले जातात. पण बीएसएनएलची स्थिती आज वेगळी आहे. हे रिकामं झालेलं कुुटुंब पुन्हा न भरण्याच्या अटीवर रिकामं करण्यात आलं आहे, हे विशेष!रिकाम्या कार्यालयाचा पहिला दिवसशुक्रवारी तब्बल ४०० कर्मचारी कमी झाल्याने बीएसएनएलमध्ये शनिवारी शुकशुकाट होता. कॅश काऊंटरलाही कर्मचारी नव्हता. याठिकाणी लवकरच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल. तोपर्यंत ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बीएसएनएलने केले आहे.दूरसंचार क्षेत्रात खासगी कंपन्या ताकदीनिशी उतरलेल्या असताना जलद आणि विनम्र सेवेची अपेक्षा करणाºया ग्राहकांना सेवा देताना आता बीएसएनएल कर्मचाºयांच्या नाकीनऊ येणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव