रखवालदार आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना घरात झोपलेल्या चौघाही मुला-मुलींची निर्दयी हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 11:41 IST2020-10-16T11:38:45+5:302020-10-16T11:41:05+5:30

रखवालदार आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना घरात झोपलेल्या चौघाही मुला-मुलींची निर्दयी हत्या झाली.

The brutal murder of all four boys and girls sleeping in the house while the guardian's parents were out of town | रखवालदार आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना घरात झोपलेल्या चौघाही मुला-मुलींची निर्दयी हत्या

रखवालदार आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना घरात झोपलेल्या चौघाही मुला-मुलींची निर्दयी हत्या

ठळक मुद्देरावेर शहराजवळील घटनाशेतमालक आल्यानंतर उघडकीस आली घटनावरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल


किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : रखवालदार आईवडील बाहेरगावी गेलेले असताना घरात एकटे झोपलेल्या चौघाही मुलामुलींची निर्दयी हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. शेतमालक हे आज सकाळी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
रावेर शहरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या बोरखेडा रोडवरील शेख  मुस्तफा शेख यांच्या केळी बागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व थोरल्या मुलासह मूळ गावी गढी (ता.बिस्टान, जि.खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी मोटारसायकलीने बाहेरगावी गेलेले होते. तेव्हा त्यांच्या घरात गाढ झोपलेल्या कु.सविता (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व नाणी (वय ५ वर्षे) या चौघाही मुला-मुलींची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्‍हाडीने घाव घालून निर्दयीपणे हत्या करून नरसंहार केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
त्यात शेतमालक शेख मुस्तफा हे सकाळी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत.

Web Title: The brutal murder of all four boys and girls sleeping in the house while the guardian's parents were out of town