शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

भुसावळ येथे तरुणीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 4:01 PM

 एकतर्फी प्रेमातून घडलेला प्रकार, तरुणास अटक

भुसावळ : येथील जळगाव रोडवरील लोणारी मंगल कार्यालयाजवळ हुडको कॉलनी येथे एका तरुणीवर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊला घडली. प्रीती ओंकार बागल (२२) असे या तरुणीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची धामधूम सुरू असताना प्रीती ओंकार बागल (२२) ही तरुणी तिच्या बहिणीसोबत अभिवादन करून घरी परत आली. त्यानंतर त्या हातपंपावर पाणी भरत असताना संशयित आरोपी सागर इंगळे हा तरुण त्या ठिकाणी आला. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझी बदनामी करेल, असा दम देऊ लागला. यानंतर त्याने खिशातून चाकू काढून सरळ तिच्या पोटात खुपसला. यावेळी तरुणी जमिनीवर कोसळली. त्याने त्या मुलीच्या कमरेवर पाय ठेवून चाकू काढून दुसरा वार केला. तरूणी जखमी अवस्थेत सैरावैरा पळू लागली. ती समोरच्या घरात घुसली व गतप्राण झाली. संशयित आरोपी इंगळे हा वार केल्यानंतरही घटनास्थळी रिक्षाच्या आडोशाला उभा होता. यावेळी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी त्याला ताब्यात घेतले.प्रीतीचे वडील मयत झाले असून, आई व सहा बहिणींसह ती राहत होती. प्रीतीने आयटीआयपर्यंत शिक्षण घेतले होते. नुकताच तिने रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, एकाच दिवशी दोन महिलांचे खून झाल्याने कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी दिल्या. हे आरोपीला ताब्यात घेतले असून प्रीतीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पालिकेच्या दवाखान्यात प्रतीक्षेत आहे.तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळसंशयित आरोपी इंगळे याचा गेल्या काही दिवसांपासून मयत प्रीतीला खूप त्रास होता. या त्रासाला कंटाळून त्या मुलीसह त्यांच्या बहिणीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना थातूरमातूर कारण सांगून जीवाची भीती दाखवून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप मयत मुलीच्या बहिणींनी केला आहे. तक्रारीची दखल घेतली असती, तर हा खून झाला नसता, असे प्रीतीच्या बहिणी टाहो फोडून बोलत होत्या.

टॅग्स :Murderखून