थोडक्यात बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:09+5:302021-01-08T04:47:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोटरी क्लब जळगाव आणि नॅब असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेल लुई यांच्या जयंतीनिमित्ताने ...

Brief news | थोडक्यात बातमी

थोडक्यात बातमी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रोटरी क्लब जळगाव आणि नॅब असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेल लुई यांच्या जयंतीनिमित्ताने ३० अंधबांधवांना वस्तू स्वरूपात भेट देण्यात आली. यावेळी डॉ. तुषार फिरके, मीनल पाटील, भालचंद्र पाटील, जितेंद्र ढाके, डॉ. काजल फिरके, योगेश गांधी, मोहन कुलकर्णी, संदीप शर्मा, योगेश चौधरी आदी उपस्थित होते.

------------------------

मु. जे. महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मु. जे.महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरी करण्यात आला. यावेळी शिक्षणशास्त्र आणि शारीरिकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अशोक राणे यांनी प्रतिमापूजन केले. याप्रसंगी प्रा.संदीप केदार, उमेश दंडगव्हाळ, तुषार भामरे, संजय जुमनाके, मोहन चौधरी, केतन पाटील, प्रवीण कोल्हे, केतन पाटील, विजय चव्हान यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

००००००००००००००

खुबचंद सागरमल विद्यालयात फुले जयंती साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : खुबचंद सागरमल विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सतीश साळुंखे यांनी मालार्पण केले. याप्रसंगी एल. एन. महाजन यांनी सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी मंगला सपकाळे, सुरेश आदिवाल, योगेद्र पवार, भास्कर कोळी, पकंज सूर्यवंशी, अजय पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

००००००००००००००००००

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १८ जानेवारीला रोजगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १८ जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असून, आयटीआय उत्तीर्ण व दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ११ महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००००००००००००००००००

विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूककरिता आचारसंहिता लागू असल्याने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

००००००००००००००००००००००००

आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या दिवशीचा आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.

०००००००००००००००००००००००००००

साखरेची जादा दराने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रायपूर येथील एका धान्य दुकानदाराकडून शासकीय दरात साखरेची विक्री न करता जादा दराने विक्री केली जात असल्याची तक्रार पुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याप्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्राराने केली आहे.

०००००००००००००००००००००

रायपूर ग्रामपंचायतीत तीन महिला बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रायपूर ग्रामपंचायतीमध्ये सात जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील तीन महिलांची बिनविरोध निवड झाली आहे. वॉर्ड क्रमांक १ मधून ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने उषाबाई परदेशी यांची, तर सर्वसाधारण महिला राखीव प्रवगार्तून पुषाबाई परदेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. वॉर्ड क्रमांक २ मधून एस. सी. प्रवर्गातून रजनी सपकाळे यांची निवड झाली आहे.

०००००००००००००००००००००००००

१०० टक्के उपस्थितीची सक्ती करू नका

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाचे कुठलेही आदेश नसताना काही शाळांमध्ये शिक्षकांना १०० टक्के उपस्थितीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन ५० टक्के उपस्थितीचे पत्रक काढण्यात यावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केली आहे.

००००००००००००००००००

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.