शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : अनुकूल अहवालासाठी लाच; शिक्षकासह गटशिक्षणाधिकारी जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 20:26 IST

एसीबीची कारवाई, धरणगाव पं.स. कार्यालयात पकडले

जळगाव : आरटीई योजनेचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठविण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेतांना धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे (वय ५७,रा.अमळनेर) व कंत्राटी शिक्षक तुळशीराम भगवान सैंदाणे (वय ३४,रा.चोपडा)या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडले. सोमवारी सायंकाळी बिऱ्हाडे यांच्या दालनातच दोघांना पकडण्यात आले असून त्यांना अटकही करण्यात आली.

तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी येथे शाळा आहे. या शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग असून २०१६ पासून स्वयं अर्थ सहाय्यता या तत्वावर चालविली जात आहे. शासनाच्या आरटीई योजनेप्रमाणे २५ टक्के विद्यार्थी शाळेत भरावयाचे असतात. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थामागे ८ हजार रुपये वार्षिक अनुदान मंजुर करत असते. या शाळेतील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत शाळेत १७ विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असून ८ हजार याप्रमाणे १७ विद्यार्थ्यांचे १ लाख ३६ हजार रुपये अनुदानाची रक्कम झालेली आहे. हे अनुदान मंजूर होण्यासाठीचा अनुकूल अहवाल तयार करुन जिल्हा परिषद, जळगाव येथे पाठवून देण्याच्या मोबदल्यात गटशिक्षणाधिकारी बिऱ्हाटेने ३० डिसेंबर रोजी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत संस्थाचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. 

दालनातच लावला सापळाउपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी धरणगाव पंचायत समितीत सापळा लावला. बिऱ्हाडे यांच्या दालनातच त्यांच्यासाठी सैंदाणे याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी,सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणJalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी