जळगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मका व कापूस या पिकाचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच घेणाºया तलाठी व कोतवालास अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी दुपारी नगरदेवळा, ता.पाचोरा येथे करण्यात आली.तलाठी मिलिंद जयवंत बच्छाव (५५, रा.कजगाव, ता.भडगाव) व कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (४५, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच घेणारा तलाठी व कोतवाल अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:39 IST