आदिवासी आश्रमशाळेचा लाचखोर मुख्याध्यापक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 17:45 IST2018-12-06T17:41:21+5:302018-12-06T17:45:37+5:30
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत असलेल्या तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

आदिवासी आश्रमशाळेचा लाचखोर मुख्याध्यापक अटकेत
ठळक मुद्देभाजीपाल्याचे बील काढण्यासाठी मागितली जाचयावल पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुडोंगरकठोरा शासकीय आश्रम शाळेतील घटना
यावल : येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत असलेल्या तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
डोंगरकठोरा येथील शासकीय आश्रम शाळेत भाजीपाला पुरवठा करणारे कंत्राटदाराचे भाजीपाल्याचे झालेले बिल मंजुरीसाठी मुख्याध्यापक राणे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी सुरु होते.