अडत दुकान फोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST2021-05-28T04:13:23+5:302021-05-28T04:13:23+5:30

बोदवड पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच चोरट्यांचा डल्ला बोदवड, जि. जळगाव : बोदवड येथील पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ...

Breaking the adat shop | अडत दुकान फोडून

अडत दुकान फोडून

बोदवड पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच चोरट्यांचा डल्ला

बोदवड, जि. जळगाव : बोदवड येथील पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या धान्य दुकानातून चोरट्यांनी दीड लाखांचे धान्य चोरून नेले. यात सव्वालाख रुपये किमतीच्या तूरडाळीच्या ३२ कट्ट्यांचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

शहरातील जामनेर रस्त्यावर न.ह. रांका हायस्कूलच्या समोर अनिल गुलाबाचंद अग्रवाल यांचे अडत दुकान आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता नियमाप्रमाणे ते दुकान बंद करून घरी निघून गेले. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या समोरच्या बाजूस असलेले शटरचे कुलूप तुटलेले तसेच शटरही अर्ध्यावर उघडे आढळले. त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. दुकानात तूरडाळीचे साठ किलो वजनाचे एकूण बत्तीस कट्टे चोरीस गेले. त्याची किंमत १ लाख १४ हजार रुपये आहे. दुकानाच्या मागील बाजूस तूरडाळ काही ठिकाणी सांडलेली आढळून आली. म्हणजेच चोरट्यांनी तूरडाळ वाहून नेल्याचे दिसत आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये याच दुकानातून जवळपास ५० क्विंटल कापूस चोरीस गेला होता. त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. तोच पुन्हा या दुकानामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सहा महिन्यांत व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अनिल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Breaking the adat shop