पहूर, ता.जामनेर : हिवरखेडा दिगर गावात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून ८० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहिती नुसार पंढरी भगवान पाटील (रा.हिवरखेडा दिगर) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २१ ग्रॅम सोने व १० भार चांदी सह बारा हजार रुपये रोख असा ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.काही जणांनी रात्री चोरट्यांना घरातून बाहेर पडताना पाहिले. त्यामुळे याची माहिती संतोष नामदेव पवार यांनी पंढरी पाटील यांना दिली.त्यामुळे रात्रीच ही घटना उघड झाली. पाटील यांच्याकडे घरफोडी करण्यापूर्वी चोरट्यांनी देवचंद लक्ष्मण पाटील व केशव देवराव पाटील यांच्या घराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती पहूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.याप्रकरणी पहूर पोलिसात पंढरी भगवान पाटील यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पहूर पोलीस करीत आहेत.
हिवरखेडा दिगर येथे धाडसी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:54 IST
हिवरखेडा दिगर गावात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून ८० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.
हिवरखेडा दिगर येथे धाडसी घरफोडी
ठळक मुद्देपहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलचोरट्यांनी केला ८० हजाराचा ऐवज लंपासदोन घरांमध्ये केला चोरीचा प्रयत्न