जळगावातील खेडी रस्त्यावरील रहिवाशी मतदानावर टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:58 IST2018-07-24T12:57:22+5:302018-07-24T12:58:33+5:30

The boycott will be held on the street in the Jalgaon village | जळगावातील खेडी रस्त्यावरील रहिवाशी मतदानावर टाकणार बहिष्कार

जळगावातील खेडी रस्त्यावरील रहिवाशी मतदानावर टाकणार बहिष्कार

जळगाव : शंकररावनगर, तळेले कॉलनी, जुना खेडी रोड या भागातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
या भागातील मतदारांसाठी मनपा प्रशासनाने शंकरराव नगरातील धनाजी नाना विद्या प्रबोधनी संचलित समाजकार्य महाविद्यालयाची मतदान केंद्रासाठी निवड केली आहे. या केंद्रात सर्वसुविधाही आहेत. मात्र, या मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यांचीही अत्यंत दैना झाली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावरुन पायी चालणेही अवघड झाले आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राजेंद्र वाघुळदे यांनी मनपा आयुक्तांना १५ दिवसांपूर्वी पत्र देऊन, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांच्या या पत्राची मनपा प्रशासनाने दखल घेतली नसून, रस्ता अद्यापही जैसे-थे आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी परिसरातील काही रहिवाशांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.वाघुळदे यांची भेट घेऊन त्यांनी मनपा प्रशासनाला दिलेल्या पत्रावर चर्चा केली. रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने, या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला आहे.

Web Title: The boycott will be held on the street in the Jalgaon village