दारूसाठी पैसे न दिल्याने डोक्यात मारली बियरची बाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:22+5:302021-01-08T04:47:22+5:30
फोटो..क्र. ८ जळगाव : लग्नाच्या कार्यक्रमात दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून राकेश दिलीप कुंभार (२५) या तरुणाच्या डोक्यात ...

दारूसाठी पैसे न दिल्याने डोक्यात मारली बियरची बाटली
फोटो..क्र. ८
जळगाव : लग्नाच्या कार्यक्रमात दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून राकेश दिलीप कुंभार (२५) या तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून दुखापत केल्याची घटना झाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पिंप्राळ्यातील गणपती नगरात शनिवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी योगेश रवींद्र चौधरी (२९,रा.गणपती नगर) याला अटक करण्यात आली आहे.
राकेश दिलीप कुंभार या तरुणाच्या घरासमाेर २ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता लग्नानिमित्त नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता. राकेश कुंभार घरीच ओट्यावर बसून कार्यक्रम पाहत होता. लग्नात नाचणारा राकेश मिलिंद जाधव (वय २५,रा. मढी चौक पिंप्राळा), गंप्या (पुर्ण नाव माहित नाही), वण्या (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. बौध्दवाडा आणि योगेश चौधरी चायनिजवाला (रा.गणपती नगर पिंप्राळा) या चौघांनी राकेश कुंभारजवळ येवून दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. यात राकेश जाधवने त्यांच्या हातातील बिअरची बाटली राकेश कुंभारच्या डोक्यात मारली व खिश्यातील ५०० रूपये जबरी काढले व बिअरचा बाटलीचा धाक दाखवून गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी जबरी हिसकावून घेतली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील योगेश चौधरी याला कॉ.रवींद्र पाटील, विनोद सोनवणे, रवी चौधरी, उमेश पवार व हरीश डोइफोडे यांच्या पथकाने सोमवारी अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.