महिलांचे मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना जळगावात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:17 IST2018-12-17T18:15:41+5:302018-12-17T18:17:25+5:30
रस्त्याने जाणाºया महिला व पुरुषांचे मोबाईल लांबविणाºया शुभम उर्फ गणेश विजय बोराडे (वय २५, रा. मकरा पार्क, वाघ नगर, जळगाव) व शुभम उर्फ विक्की राजेंद्र चव्हाण (वय २१, रा.साई छत्र चौक, वाघ नगर, जळगाव) या दोघांच्या मुसक्या रविवारी रामानंद नगर पोलिसांनी आवळल्या.

महिलांचे मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना जळगावात अटक
जळगाव : रस्त्याने जाणाºया महिला व पुरुषांचे मोबाईल लांबविणाºया शुभम उर्फ गणेश विजय बोराडे (वय २५, रा. मकरा पार्क, वाघ नगर, जळगाव) व शुभम उर्फ विक्की राजेंद्र चव्हाण (वय २१, रा.साई छत्र चौक, वाघ नगर, जळगाव) या दोघांच्या मुसक्या रविवारी रामानंद नगर पोलिसांनी आवळल्या. दोघांकडून चोरीचा एक मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुलांना क्लासला सोडून घरी पायी जात असलेल्या सपना कुणाल पांडे (वय ३३, रा.मायादेवी नगर, जळगाव) या महिलेच्या हातातून या दोघांनी १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना महाबळ परिसरात घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
सपना पांडे यांच्या हातातील मोबाईल गणेश व विक्की या दोघांनी लांबविल्याची माहिती नवचैतन्य कोर्सला असलेले रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रदीप चौधरी यांना मिळाली होती.