या गुन्ह्यातील जुगल बागुल, भूषण बिऱ्हाडे व महेंद्र राजपूत तिघे जण फरार आहेत. महेंद्र हा मुख्य सूत्रधार असून त्यानेच गोळीबार केल्याची माहिती अटकेतील दोघांनी दिली. या गुन्ह्यात दोन पिस्तुलांचा वापर झाल्याचे सांगितले जात असताना तपासात एकच पिस्तूल असल्याचे उघड झाले आहे. हे पिस्तूल महेंद्र राजपूत याच्याकडे असून त्याला अटक झाल्यावरच बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. फरार असलेल्या तिघांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, गोळीबारानंतर पळून गेलेल्यांच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी रात्रभर नियंत्रण कक्ष तयार केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र वारुळे व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर तांत्रिक विश्लेषण करून पथकाच्या संपर्कात होते, तेव्हा संशयित हाती लागले.
गोळीबार प्रकरणातील दोघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST