भुसावळातील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 13:03 IST2019-07-14T13:02:05+5:302019-07-14T13:03:08+5:30

शनिवारी रात्री ८ वाजता घडली होती घटना

Both of them were arrested in the firing incident | भुसावळातील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

भुसावळातील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

जळगाव : भुसावळ येथे कुटुंंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या खलील अली मोहम्मद शकील (२५, रा़ गेंदालाल मिल, जळगाव) या तरूणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले आहे.
खलील अली मोहम्मद शकील (२५, रा़ गेंदालाल मिल, जळगाव) हा तरुण भुसावळ येथे कुटुंंबियांना भेटण्यासाठी गला होता. त्या वेळी खडका रोड चौफुलीवर त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजता घडली होती़ यात खलील याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याला जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
खलील हा मुळचा भुसावळ येथील रहिवासी असून कुटूंबीय त्याठिकाणी वास्तव्यास आहेत़ सध्या तो गेंदालाल मिल परिसरात काकांकडे राहत आहे़ शनिवारी तो भुसावळला कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला होता़ त्यानंतर रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी भुसावळातील खडका रोड येथे आला़ त्यावेळी विक्की नामक तरूण हा इतर चार तरूणांसोबत त्याठिकाणी आला व तू खूप दिवसांनी भेटला म्हणत वाद घालू लागला़ त्यानंतर विक्की आणि त्यासोबतच्या एका तरूणाकडे बंदूक होती़ त्या दोघांनी पहिले तीनवेळा हवेत गोळीबार केला. त्यानंतर खलीलच्या दिशेने चारवेळा गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी खलीलच्या हाताला लागली अन् तो गंभीर जखमी झाला़ त्याला काही लोकांना पोलीस ठाण्यात नेले़ त्याचा जबाब नोंदवून घेतला़ प्राथमिक उपचारानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते.

 

Web Title: Both of them were arrested in the firing incident

टॅग्स :Jalgaonजळगाव