बुलेटवर दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:33 IST2019-01-07T12:33:12+5:302019-01-07T12:33:33+5:30
एलसीबीची कारवाई

बुलेटवर दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक
जळगाव : बुलेटवरुन देशी दारुची वाहतूक करणाºया हितेश नाना बाविस्कर (वय २१) व भोला पुरुषोत्तम सोनवणे (वय १९) दोन्ही रा.सिध्दार्थ नगर, पिंप्राळा, जळगाव या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख २५ हजार ९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा हुडको भागात अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन सहायक निरीक्षक महेश जानकर, सहायक फौजदार मनोहर देशमुख, हेडकॉन्स्टेबल रवींद्र गिरासे, रामचंद्र बोरसे, विनोद संभाजी पाटील, विनयकुमार देसले,अशरफ शेख, दिनेश बडगुजर, दादाभाऊ पाटील व मुरलीधर बारी यांच्या पथकाने रविवारी गुजराल पेट्रोल पंप भागात पिंप्राळा रस्त्यावर सापळा लावला असता हितेश व भोला हे बुलेटवरुन (क्र.एम.एच. १९ डी.ई.१७०९) येताना दिसले. दोघांजवळ दोन खोके होते व त्यात देशी दारु आढळून आली. दोघांना ताब्यात घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. बुलेट व दारु जप्त करण्यात आली आहे.