Both stolen in Jalgaon; But that's the third one in the closet | जळगावात दोघांनी केली चोरी; पण कोठडीत गेला तिसराच
जळगावात दोघांनी केली चोरी; पण कोठडीत गेला तिसराच

जळगाव : तक्रारदार व पोलीस यांच्या आतताईपणाचा फटका निष्पाप दुसऱ्या दोन तरुणांना बसला. गुन्हा करणारे दुसरेच असताना कोठडीची हवा तिसºयाला खावी लागली.

यावल येथील कांतीलाल कोळी याच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र धरणावर आंघोळीला गेले होते. मात्र दुुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले त्यांचे मोबाइल चोरीला गेले. सर्व मित्रांनी कांतीलाल व त्याचा मित्र विजय यांनीच मोबाइल लांबविल्याचा आरोप केला. त्यांनी कांतीलाल व विजयच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. अटकेच्या भीतीने कांतीलाल गायब झाला. पोलिसांनी विजयला अटक करुन पाच दिवसांची पोलीस कोठडी घेतली.

कांतीलाल व विजय या दोघांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची भेट घेऊन मुलांनी मोबाइल चोरलेच नाहीत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक पातळीवर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीत, असे तळमळीने सांगितले. नातेवाईकांची तळमळ पाहता कुठे तरी पाणी मुरत असल्याचा संशय डॉ. उगले यांना आला, त्यामुळे त्यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविले. पण गुन्हे शाखेने केलेल्या तपासात तमीज इरफान तडवी (२५) व अमीन उमेदा तडवी (२५) हे चोर असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Both stolen in Jalgaon; But that's the third one in the closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.