दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST2021-06-06T04:13:15+5:302021-06-06T04:13:15+5:30

युनियन बँकेचा कर्मचारी सागर एकनाथ पाटील (२८, नायगाव, ता. यावल, ह.मु. सुरभी कॉलनी अमळनेर) याने त्याच्या राहत्या घरी आतून ...

Both committed suicide by strangulation | दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

युनियन बँकेचा कर्मचारी सागर एकनाथ पाटील (२८, नायगाव, ता. यावल, ह.मु. सुरभी कॉलनी अमळनेर) याने त्याच्या राहत्या घरी आतून कडी लावून पंख्याच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सागरला डबा देणारा प्रसाद बाविस्कर डबा द्यायला गेला असता ही घटना उघडकीस आली. त्याच्याजवळ सुसाईड नोट आढळून आली. त्यात त्याने संतोष पातोडे व स्वप्निल शिंदे (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) टॉर्चर करीत असल्याचे लिहिल्याचे समजते. त्यांना सोडू नका, असेही त्यात म्हटल्याचे समजते. बँकेचे मॅनेजर अजय शुक्ला यांनी खबर दिल्यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल ठाकरे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत गांधलीपुरा भागातील प्रशांत संजय धामणे याने ४ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावर लोखंडी अँगलला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशांतचे आजोबा अशोक देविदास लोहरे यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

Web Title: Both committed suicide by strangulation