शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कॉर्पोरेट टॅक्स कपातीचा बुस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:30 PM

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कार्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केल्याने जळगावातील सुवर्ण व्यवसायासह डाळ व पाईप उद्योगालाही बुस्टर डोस मिळणार आहे. कार्पोरेट टॅक्स कमी केल्याने सुवर्ण व्यावसायावर नव्हे तर व्यावसायिकांच्या लाभावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टॅक्स कमी केला असली तरी सोने-चांदीचे भाव कमी होणार नसून केवळ सुवर्ण आभूषणे तयार करणाऱ्या उत्पादकांना त्याचा लाभ होणार आहे. कर कमी करण्याच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव १०० रुपयांनी वधारून ३७ हजार ८०० रुपयांवर पोहचले तर चांदी ४७ हजार ५०० रुपयांर स्थिर आहे. भारतात सुवर्ण आभूषणांनाही मोठे महत्त्व असल्याने या व्यवसायातही मोठी उलाढाल होत असते. त्यात सुवर्णनगरी जळगावात हा व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मंडळींचा कर भरण्यात मोठा हातभार असतो. सोने-चांदी व्यवसायावर याचा काहीही परिणाम होणार नसल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगत आहे. वर्ष अखेर आयकर भरताना त्यावर लागणाºया कार्पोरेट टॅक्समध्ये ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वेळी हा कर भरला जाईल, त्या वेळी त्याचा लाभ व्यावसायिकांना होणार आहे. मात्र तोदेखील सर्व सुवर्ण व्यावसायिकांना नाही तर जे आभूषण तयार करतात, त्यांनाच हा लाभ होणार आहे. व्यावसायिक वर्षअखेरीस जो कर भरतात त्यात ही सूट असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना मिळणे शक्य नाही. जळगावात दीडशेच्यावर सुवर्ण पेढ्या असल्या तरी आभूषण निर्माते केवळ आठच आहेत. त्यामुळे ग्राहकांना इतर सुवर्ण व्यावसायिक लाभ देऊ शकत नाही. सोन्यावरील जीएसटी व सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) कमी केले असते तर सोन्याचे भाव कमी झाले असते व त्याचा ग्राहकांना लाभ झाला असता. केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्क वाढविल्याने सोन्याचे भाव वाढले होते. मात्र शुक्रवारी कार्पोरेट टॅक्स कमी केला असला तरी सोन्याचे भाव १०० रुपयांनी वाढून ते ३७ हजार ७००वरून ३७ हजार ८००वर गेले.छोट्या पाईप उद्योगांना मिळणार चालनाजळगावात सुवर्ण व्यवयासासह पाईप उद्योगही मोठा आहे. पाईपच्या दोन मोठ्या व १० प्रा.लि. कंपन्या जळगावात असून कार्पोरेट टॅक्स कमी केल्याने त्याचा लाभ मोठ्या कंपन्यांना होणार आहे. मात्र इतर प्रा.लि. कंपन्यांना त्याचा लाभ होणार नसला तरी मोठ्या कंपन्यांमुळे या कंपन्यांना चालणा मिळू शकते, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यामुळे या निर्णयाचे पाईप उद्योगातूनही स्वागत होत आहे.मंदावलेल्या डाळ उद्योगांना येईल भरारीकार्पोरेट टॅक्स कमी केल्याने देशातील ४० टक्के डाळीचे उत्पादन असणाºया जळगावातील दालमिलला मोठा लाभ होणार आहे. उद्योग जगतातील मंदीचा फटका दालमिललाही बसण्यासह निसर्गाच्या लहरीपणामुळे कडधान्याचे उत्पादन घटल्याने दालमिलच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. मात्र आता हा कर कमी केल्याने जळगावातील ६५ दालमिलला नक्कीच फायदा होऊन उद्योग वाढीस चालना मिळणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव