बोगस लग्न लावणाºया टोळीतील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 01:09 AM2019-11-21T01:09:14+5:302019-11-21T01:12:58+5:30

धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी आचल अजयराव देशमुख हिच्याशी बोगस लग्न लावून देवून पोबारा करण्याचा करणाºया नागपूरच्या टोळीतील दोघांना धरणगाव पोलिसांनी नागपूर येथून अटक करून आणले.

Bogus couple arrested for marrying | बोगस लग्न लावणाºया टोळीतील दोघांना अटक

बोगस लग्न लावणाºया टोळीतील दोघांना अटक

Next
ठळक मुद्देसबजेलला रवानगीधरणगाव पोलिसांनी नागपुरात घेतले ताब्यात

धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी आचल अजयराव देशमुख हिच्याशी बोगस लग्न लावून देवून पोबारा करण्याचा करणाºया नागपूरच्या टोळीतील दोघांना धरणगाव पोलिसांनी नागपूर येथून अटक करून आणले. त्यांना दि.२० रोजी धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची सबजेलला रवानगी करण्यात आली आहे. या टोळीतील म्होरक्या राजू बोपचे हा मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी रवींद्र सुरेश पाटील रा.बोरगाव, ता.धरणगाव याच्याशी नागपूरच्या काही दलालांनी आचल अजयराव देशमुख रा.नागपूर हिच्याशी लग्न लावून दिले होते. मात्र दोन दिवसातच आचलने पळ काढण्याच्या प्रयत्न केल्याने या लग्नात दलालांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने या घटनेसंदर्भात रवींद्र सुरेश पाटील रा.बोरगाव याने दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणूक केल्याप्रकरणी आचल अजयराव देशमुख रा. नागपूर तसेच राजू बोपचे, अंकुश देवीलाल पटोले, निशांत देवीलाल पटोले यांच्याविरुध्द भादंवि ४२०, ४९५, ४१७, २९४, ३२३, ३५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा आचलला अटक करण्यात आली होती. १५ दिवसांनंतर तिची जामिनावर मुक्तता झाली होती.
१९ रोजी तपास अधिकारी सपोनि पवन देसले, हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.खुशाल पाटील व ठाकरे यांनी अंकूश देवीलाल पटोले व निशांत देवीलाल पटोले यांना रा.जैताला, नागपूर येथून अटक केली. या दोघांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश एस.डी.सावरकर यांनी त्यांना न्यायालयीन कस्टडी सुनावली. त्यामुळे या दोघांची सबजेलला रवानगी करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुख्य आरोपी राजू बोपचे हा हाती लागावा यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
रॅकेट शोधावे
ज्यांच्यामुळे हे बिंग उघडकीस आले ते बोरगावचे सर्व ग्रामस्थ आजही उत्सुकतेने न्यायालयात थांबून होते. या प्रकरणातील मुख्य आरोपींचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जनाबाई भगवान पाटील, पप्पू पाटील, माजी सरपंच भालचंद्र मुन्ना पाटील, विकी पाटील, विजय पाटील यांनी केली आहे.

Web Title: Bogus couple arrested for marrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.