शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जळगावात रुळावर तरुण-तरुणीचा मृतदेह, आत्महत्येचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:40 PM

तरुणाच्या हातावर रुपाली-इंद्रा नाव

ठळक मुद्देहातावरच्या नावावरुन शोध सुरु10 तासापूर्वीची घटना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23- काशिनाथ पलोड स्कूलजवळून गेलेल्या मध्य रेल्वेच्या रुळावर सोमवारी सकाळी साडे सात वाजता एक तरुण व तरुणीचा मृतदेह आढळून आला. एक ते दीड कि.मी.र्पयत दोन्ही मृतदेह रेल्वेने फरफटत आल्याने त्यांच्या अंगावरील कपडे फाटले असून चेहरे छिन्नविछिन्न असल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, या घटनेतील तरुणाचे वय 25 ते 26 व तरुणीचे वय 18 ते 20 या दरम्यान आहे. हे तरुण-तरुणी विवाहिती की अविवाहित हे देखील स्पष्ट झालेले  नाही. प्रेमप्रकरणातून किंवा अन्य कारणातून दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. याशिवाय हा खूनाचा तर प्रकार नाही ना? या संशयावरही पोलिसांनी तपास सुरु केला आहे.  दरम्यान, दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारगृहात ठेवण्यात आले आहेत. एक कि.मी.र्पयत कपडय़ांचा शोधदोघांच्या अंगावर कपडे नसल्याने तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे व उमेश भांडारकर यांनी रेल्वे रुळावर दोन्ही बाजुंनी एक कि.मी.र्पयत पाहणी केली. ओळख पटविण्यासाठी कपडे किंवा काही वस्तू मिळते का म्हणून दोन्ही कर्मचा:यांनी परिसर पिंजून काढला, मात्र काहीच वस्तू व पुरावा मिळाला नाही. त्यामुळे या दोघांचे मृतदेह नऊ वाजता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी दिली.हातावरच्या नावावरुन शोध सुरुतरुणाच्या उजव्या हातावर रुपाली व इंद्रा असे गोंधलेले आहे. त्यामुळे तरुणीचे नाव रुपाली व तरुणाचे नाव इंद्र असावे अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. नावावरुन तरी हे तरुण-तरुणी महाराष्ट्रातीलच असावे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. कोणत्या पोलीस स्टेशनला तरुण व तरुणीची हरविल्याची किंवा अपहरणाची तक्रार दाखल आहे का? याची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे.10 तासापूर्वीची घटनामृतदेहाची अवस्था पाहता ही घटना दहा तास आधी घडलेली असावी. दोघांचे मृतदेह काळे पडले आहेत. दरुगधी मात्र येत नव्हती. खांब क्रमांक 413/28 जवळ हे मृतदेह आढळून आले. दोघांच्याही चेह:याला जबर मार लागला आहे. त्यामुळे ओळख पटविणे अवघड झाले आहे.