जळगावात आढळला तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:43 IST2020-06-19T12:43:21+5:302020-06-19T12:43:55+5:30
घातपात की आत्महत्या ?

जळगावात आढळला तरुणाचा मृतदेह
जळगाव : शहरातील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असणाऱ्या दुकानाच्या ओट्यावर शुक्रवारी सकाळी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाचा खून झाली आणखी काही प्रकार आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
या तरूणाचा घातपाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी येथून जाणाºया काही जणांना हा मृतदेह दिसल्याने त्यांनी या संदर्भात शहर पोलीस स्थानकात याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.