नांद्रा येथील विहिरीत आढळला बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:09 IST2018-09-24T23:08:14+5:302018-09-24T23:09:47+5:30
नांद्रा शिवारातील विहिरीत कुरंगी येथील बेपत्ता शेतकरी आबा धोंडू पाटील (वय-४७, रा.कुरंगी, ता.पाचोरा) यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नांद्रा येथील विहिरीत आढळला बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह
पाचोरा : नांद्रा शिवारातील विहिरीत कुरंगी येथील बेपत्ता शेतकरी आबा धोंडू पाटील (वय-४७, रा.कुरंगी, ता.पाचोरा) यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण समजलेले नाही.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, आबा धोंडू पाटील (वय ४७ रा कुरंगी ता पाचोरा) हे ४ दिवसापासून काहीही न सांगता निघून गेले होते. याप्रकरणी पाचोरा पोलिसात हरविल्याची नोंद आहे. सोमवार २४ रोजी सकाळी ११ चे सुमारास नांद्रा शिवारातील रजूबाई सुभाष पाटील यांच्या शेतातील विहिरीत एक मृतदेह आढळला. चौकशीनंतर हा मृतदेह आबा धोंडू पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मयताच्या पश्चात पत्नी, २ मुले १ मुलगी परिवार आहे.