मेहरुण तलावात आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह

By Admin | Updated: June 5, 2017 16:20 IST2017-06-05T16:20:58+5:302017-06-05T16:20:58+5:30

ऑर्डनन्स फॅक्टरीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी गेली होती बाहेर

The body of the girl was found in Meherun lake | मेहरुण तलावात आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह

मेहरुण तलावात आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.5- ऑर्डनन्स फॅक्टरीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मयुरी सुरेशचंद्र पवार (वय 19 रा.गितावाडी, ऑटो नगर, जळगाव) या तरुणीचा सोमवारी सकाळी सहा वाजता मेहरुण तलावात पाण्यात तरंगलेला मृतदेह आढळून आला आहे. मयुरी हिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला असला तरी ही घटना नेमकी आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलीस तपास सुरु आहे.
बांभोरी येथील त्रिमूर्ती अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक डिप्लोमाच्या दुस:या वर्षाला असणा:या मयुरीने ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीसाठी निघालेल्या विविध पदांसाठी परीक्षा दिली होती. 4 जून रोजी या परीक्षेचा ऑनलाईन निकाल लागणार होता. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता ती दुचाकीने (एम.एच.19 ए.एच.0485) हा निकाल पाहण्यासाठी घराबाहेर पडली. जातांना घरी निकालाचेच कारण सांगून गेली व संध्याकाळी परतच आली नाही.
तलावाकाठी आढळली दुचाकी 
मुलगी रात्री उशिरार्पयत घरी न आल्याने आई शिलाबाई, वडील सुरेशचंद्र पवार व भाऊ हर्षल यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. शोध घेत असतानाच तिचा मित्र शुभम उर्फ कुणाल पवार याने मयुरीच्या वडीलांना फोन करुन तिची दुचाकी मेहरुण तलावाकाठी असल्याची माहिती दिली.त्यानुसार सर्वजण तिथे गेले असता दुचाकी व सॅँडल तलावाकाठी होते तर डिक्कीत मोबाईल व दुचाकीची चावी होती. परिसरात शोध घेतल्यानंतर रात्री 1 वाजता वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मयुरी हरविल्याची तक्रार दिली होती.

Web Title: The body of the girl was found in Meherun lake