पशुधनाच्या अवैध वाहतुकीच्या निषेधार्थ बोदवडला मोर्चा 

By चुडामण.बोरसे | Updated: March 11, 2024 13:06 IST2024-03-11T13:05:38+5:302024-03-11T13:06:10+5:30

या मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Bodwadla Morcha to protest illegal movement of livestock | पशुधनाच्या अवैध वाहतुकीच्या निषेधार्थ बोदवडला मोर्चा 

पशुधनाच्या अवैध वाहतुकीच्या निषेधार्थ बोदवडला मोर्चा 

गोपाल व्यास

बोदवड (जि.जळगाव) : पशुधनाची अवैध वाहतूक प्रकरणात पोलिसांनी  कुठलीही कारवाई केली नाही, तसेच  तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांना असभ्य वागणूक दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी बोदवड येथे सामाजिक संघटनांतर्फे मोर्चा काढण्यात आला. 

यात धुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षक समिती जनआंदोलनाचे प्रांतीय अध्यक्ष संजय रामेश्वर शर्मा, भाजपाचे गणेश शर्मा, अमोल शिरपूरकर आदी सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसील कार्यालयावर येताच  बोदवडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व पोकाॕ. शशिकांत शिंदे यांना निलंबित करावे, या मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Web Title: Bodwadla Morcha to protest illegal movement of livestock