बोदवडला कोरोनाची ग्रामीण भागात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 15:07 IST2020-06-21T15:04:20+5:302020-06-21T15:07:36+5:30

बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

Bodwadla corona hits rural areas | बोदवडला कोरोनाची ग्रामीण भागात धडकी

बोदवडला कोरोनाची ग्रामीण भागात धडकी

ठळक मुद्देकोल्हाडी येथील एकाचा मृत्यूपरिसर केला सील

गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : कोरोनाने ग्रामीण भागात आता आपले हातपाय पसरवायला सुरवात केली असून तालुक्यातील कोल्हाडी येथील ६० वर्षीय नागरिकाला अस्वस्थ वाटत असल्याने जळगावी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. या व्यक्तीचा २० रोजी उपचार दरम्यान मृत्यू झाला.
जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २१ रोजी सकाळी गावातील गावात राहत असलेल्या ठिकाणाचा भाग सील केला. त्यांच्या संपर्कातील नागरिकांना घरीच क्वॉरंटाइन करण्यात आले.
शहरात आज सर्व प्रकारच्या गाड्या लागलेल्या असून प्रशासनानेही गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते.

Web Title: Bodwadla corona hits rural areas