बोदवडला भरवस्तीत घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:30+5:302021-09-09T04:22:30+5:30
शहरातील बारभाई गल्लीत राहणारे विशाल सुरेश जैस्वाल हे रात्री दुमजली घराच्या खालच्या खोलीला कुलूप लावून वरील मजल्यावर झोपले असताना ...

बोदवडला भरवस्तीत घरफोडी
शहरातील बारभाई गल्लीत राहणारे विशाल सुरेश जैस्वाल हे रात्री दुमजली घराच्या खालच्या खोलीला कुलूप लावून वरील मजल्यावर झोपले असताना अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडून कपाटात असलेले तीस ग्रॅम सोन्याची मंगळपोत, दहा ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, अर्धा ग्रॅम सोन्याचे मणी, सात भार वजनाचा चांदीचा कमरपट्टा, पैंजण, जोडवे, सोन्याचे मनगटे असा एकूण पोलीस पंचनाम्यानुसार एक लाख ९६ हजार तर बाजार भावाप्रमाणे सुमारे अडीच लाखाचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. सकाळी सात वाजता वरील मजल्यावरून घरमालक विशाल जैस्वाल हे खाली उतरले असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. गत चार महिन्यांपूर्वीच विशालचे लग्न झाले असून लग्नात सर्व दागिने गेल्याने कुटुंबीय हताश झाले आहे. याबाबत त्यांनी बोदवड पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सकाळी सात वाजल्यापासून घटना घडूनही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घटनास्थळी श्वानपथक अथवा ठसे तज्ज्ञ आलेले नव्हते. तर शहरातील मलकापूर रस्त्यावर असलेल्या मेडिकल स्टोअर्सवर औषध खरेदी करण्यासाठी गेलेले जीवनधर शंभुकुमार सिंगतकर यांच्या खिशात असलेला ३५ हजार रुपयांचा मोबाइल अज्ञात चोरट्यानी लांबवला.