पिलखोड शिवारात शिक्षकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:00 IST2017-10-30T12:59:39+5:302017-10-30T13:00:38+5:30
अकस्मात मृत्यूचू नोंद

पिलखोड शिवारात शिक्षकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
ठळक मुद्दे पिंपळवाड - म्हाळसा येथील रहिवासीशेतातील झाडाला गळफास
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 30 - पिंपळवाड - म्हाळसा येथील रहिवासी आणि जि. प. प्राथमिक देशमुखवाडी शाळेतील शिक्षक आबासाहेब चिंधा चौधरी हे सोमवारी सकाळी सहा वाजता गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.
पिलखोड शिवारात चौधरी यांचे शेत असून शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत ते कुटुंबियांना आढळून आले. मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.