बोदवड तालुक्यात पावसाने पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 17:41 IST2019-08-04T17:39:22+5:302019-08-04T17:41:07+5:30

यंदा पावसाने बोदवड तालुक्यावर मेहरबानी केल्याने आतापर्यंत पिके आबादानी झाली आहे. तालुक्यात सरासरी ३०० मि.मी. पाऊस झाला आहे. पीक परिस्थिती उत्तम आहे.

In Bodawad taluka, rains swept the crops | बोदवड तालुक्यात पावसाने पिके तरारली

बोदवड तालुक्यात पावसाने पिके तरारली

ठळक मुद्देआता उघडीपची गरजतालुक्यात सर्वाधिक लागवड मका पिकाची

बोदवड, जि.जळगाव : यंदा पावसाने बोदवड तालुक्यावर मेहरबानी केल्याने आतापर्यंत पिके आबादानी झाली आहे. तालुक्यात सरासरी ३०० मि.मी. पाऊस झाला आहे. पीक परिस्थिती उत्तम आहे. यंदा तालुक्यात सर्वाधिक मका पिकाची लागवड झाली असून त्याबरोबर कापूस ही लागवड करण्यात आला आहे.
तलाव भरले. शहरातील हिरवा तलाव, सारंगी तलाव भरले असून, विहिरींनाही बऱ्यापैकी पाणी आले आहे. गत पाच दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाची उघडीप झाल्यास पिकांनाही फायदा होईल व शेती कामांनाही मोकळीक मिळेल, असे चित्र तालुक्यात आहे.
दरम्यान, अद्याप पावसाने तालुक्यात किरकोळ घटना वगळल्यास नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Web Title: In Bodawad taluka, rains swept the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.