भुसावळात एकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 18:55 IST2017-09-18T16:56:01+5:302017-09-18T18:55:10+5:30

पंचवटी हनुमान मंदिराच्या ओटय़ावरील पहाटेची घटना

The bloodless blood of one in the sea | भुसावळात एकाचा निर्घृण खून

भुसावळात एकाचा निर्घृण खून

ठळक मुद्देलाकडी दांडय़ाने मारहाण करीत केला निर्घृणपणे खूनमयत मंदिरांमध्ये जाऊन तेथील सफाई करीत होतापोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.19 - गंगाराम प्लॉटमधील रहिवासी विजय लक्ष्मण ठाकूर (वय 53) या इसमाचा लाकडी दांडय़ाने मारहाण करीत निर्घृणपणे खून केल्याची घटना सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास हनुमान नगरातील पंचवटी हनुमान मंदिराच्या ओटय़ावर उघडकीस आले.
पोलिसांच्या माहितीनुसार विजय ठाकूर हा वेडसर होता. शहरात ठिकठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये जाऊन तेथील सफाई करणे व  देवदेवतांची गाणी म्हणत होता.  त्याचे कोणाशही वैर वा भांडण नव्हते, अशा व्यक्तीचा खून झाल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी तातडीने  घटनास्थळी धाव घेतली. परीसराची पाहणी केली.
दरम्यान, या वेडसर इसमाचा खून करण्यामागील कारण काय? चोरीच्या उद्देशाने तर ही घटना घडली नाही, ना या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. राजेंद्र लक्ष्ण ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: The bloodless blood of one in the sea