शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

प्रेमप्रकरणातून तृतीयपंथीयाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:20 PM

चौघांना अटक : मृत नशिराबाद येथील मूळ रहिवासी

जळगाव : पत्नी व मुलांना सोडून सोबत रहा, अन्यथा घरी व नातेवाईकांना सांगून बदनामीची धमकी देणाऱ्या चंदा उर्फ कैलास (मुळ रा.नशिराबाद, ह.मु.अडावद, ता.चोपडा) या तृतीयपंथीयाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता बोदवड तालुक्यातील नाडगाव शिवारातील उजनी दर्गाजवळ घडली.याप्रकरणी चंदाचा प्रियकर संदीप कैलास साळुंके (३०), त्याचा साथीदार राहूल विष्णू ठाकरे (३२), आकाश जयंत सोनवणे (२०) व अतुल हिरालाल धनगर (२२) सर्व रा.कमळगाव, ता.चोपडा या चौघांना लोकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चौघांना अटक करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप साळुंके व तृतियपंथी चंदा यांच्यात तीन वर्षापासून प्रेमप्रकरण होते. संदीप याने पत्नी व मुलांना सोडून आपल्यासोबत रहावे म्हणून चंदाचा आग्रह होता, मात्र ते शक्य नसल्याने चंदाकडून घरी कुटुंबात व नातेवाईकात सांगून बदनामी करण्याची धमकी दिली जात होती. आपले बिंग फुटू नये म्हणून संदीप याने रविवारी चंदाला उजनी दर्ग्याच्या दर्शनासाठी जायचे आहे असे सांगून मित्राच्या चारचाकीतून (क्र.एम.एच.१९ बी.जे.९५४२) राहूल, आकाश तसेच अतुल यांना सोबत घेऊन उजनी दर्गा ते सोनोटी रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ नेऊन चाकूने भोसकून खून केला.चौघांना केली अटकदरम्यान, घटनेच्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार शरद भालेराव, दीपक पाटील, विनोद पाटील व अरुण पाटील यांचे पथक निंबोल दरोड्याच्या तपासासाठी जात असताना हा प्रकार त्यांना समजला. बोदवडचे निरीक्षक खरे,सहायक फौजदार विजेश पाटील, संजय भोसले व इतरांनी गावकऱ्यांच्या ताब्यातून आरोपींना घेऊन पोलीस ठाण्यात आणले.मारु नकाचा आवाज ऐकला अन् चौघे फसलेचंदावर चाकूने वार होत असताना मला मारु नका...असा जोराचा आवाज काही अंतरावर असलेल्या किशोर अशोक अवचारे (रा.सोनोटी, ता.बोदवड) या ट्रक्टर चालकाला आला. काय प्रकार आहे यासाठी पुढे जावून बघण्याचा प्रयत्न करीत असताना रक्ताने भरलेल्या अवस्थेत चौघं जण पळताना दिसले. एकाच्या हातात चाकू होता. अवचारे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता तु तुझे काम कर..असे म्हणून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना शेजारी बकºया चारणाºया तरुणांच्या मदतीने चौघांना पकडण्यात आले. त्यानंतर जेथे आवाज येत होता तेथे त्यांना नेले असता साडी परिधान केलेली महिला मृतावस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात दिसली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव