राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनेतर्फे रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:10 IST2021-02-22T04:10:56+5:302021-02-22T04:10:56+5:30
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय हिंदू सेनेतर्फे शिवतीर्थ मैदानावर रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...

राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनेतर्फे रक्तदान शिबीर
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय हिंदू सेनेतर्फे शिवतीर्थ मैदानावर रक्तदान शिबिर घेण्यात आले. सेवनिवृत्त जवान किरण महाजन व दिल्ली येथे कार्यरत असलेले जवान मयूर वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मयूर वाघमारे यांच्यासह २०२ जणांनी यावेळी रक्तदान केले. राष्ट्रीय हिंदू सेना सुरक्षा व जळगाव टाइगर ग्रुप यांच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. भरत गायकवाड, डॉ. एम. देशपांडे, डॉ. एम. पटेल, सूरज पाटील, राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष मयुर वाघमारे, उपाध्यक्ष विवेक महाजन, सचिव प्रदीप सोनार, हेमंत सोनार, प्रकाश सपकाळ, राकेश महाजन, लखन वालेचा, योगेश सोनवणे, गौरव उमप, सोपान मानकर, जितू निंबाळकर, मनोज बाविस्कर, आनंद घुगे, किरण चौधरी, दीपक गायकवाड, रवींद्र पाटील, विशाल काकडे आदी उपस्थित होते.