११ महिलांसह ६१ डॉक्टरांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:54+5:302021-07-02T04:12:54+5:30

जळगाव : नॉन कोविड यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर येत असताना आगामी काळात रक्ताच्या तुटवड्याची परिस्थिती बघता या पार्श्वभूमीवर आयएमए ...

Blood donation of 61 doctors including 11 women | ११ महिलांसह ६१ डॉक्टरांचे रक्तदान

११ महिलांसह ६१ डॉक्टरांचे रक्तदान

जळगाव : नॉन कोविड यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर येत असताना आगामी काळात रक्ताच्या तुटवड्याची परिस्थिती बघता या पार्श्वभूमीवर

आयएमए जळगावने रक्तदानासाठी पुढाकार घेत डॉक्टर्स डे चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात ११ महिला

डॉक्टर्ससह ६१ डॉक्टर्सनी रक्तदान केले. आयएमए हॉल येथे गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळात हे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे याच्या हस्ते झाले. आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. अनिल पाटील, डॉ. संजीव भिरुड, डॉ. विलास भोळे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. शिरीष चौधरी, डॉ. राजेश डाबी, डॉ. राहुल महाजन, डॉ. संजय बाविस्कर, डॉ. अनिल खडके, डॉ. श्रीराज महाजन, डॉ. अतुल चौधरी, डॉ. अतुल पाटील, डॉ. धीरज चौधरी, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. अविनाश भोसले, डॉ. नितीन पाटील, डॉ. जितेंद्र कोळी, डॉ. सुशील राणे, डॉ. अमित भंगाळे, डॉ. समीर शाह, डॉ. अमेय कोतकर, डॉ. स्वप्नील कोठारी आदी उपस्थित होते. डॉ. भरत बोरोले, डॉ. राहुल मयूर, डॉ. दिलीप महाजन, डॉ. सचिन देशमुख, डॉ. किशोर पाटील आदिंनी परिश्रम घेतले.

यांनी घेतला पुढाकार

डॉ. चंचल शाह, डॉ. लीना पाटील, डॉ. आम्रपाली काकलिया, डॉ. दर्शना शाह, डॉ. अश्विनी टेणी, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. वीणा महाजन, डॉ.सुवर्णा जोशी, डॉ. विजयश्री मुठे या ११ महिला डॉक्टर्स, तसेच जेष्ठ नागरिक डॉक्टर्स, विशेषज्ञ डॉक्टर्स,तसेच अति दुर्मिळ रक्तगट असलेल्या डॉक्टरांनीही रक्तदान केले. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र यांचे तंत्रज्ञ व कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Blood donation of 61 doctors including 11 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.