शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सासरच्या मंडळीकडून जावयाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:46 PM

बॅटरी स्फोटाचा बनाव

जळगाव : सासरच्या मंडळीने मुलाची गोळी झाडून हत्या केलेली आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे दिलेले असतानाही अमळनेर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप मृत योगेश सुरेश कुमावत (औरंगाबाद) याची आई मंगलाबाई कुमावत व इतर नातेवाईकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.नातेवईकांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील योगेश कुमावत या युवकाचा अमळनेर मधील मुंदडा नगरातील माधुरी उदेवाल हिच्याशी २३ आॅगस्ट २०१८ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर पती-पत्नीत खटके उडायला लागले. त्यामुळे माधुरी ही ६५ हजार रुपये घेवून माहेरी निघून आली होती. त्यानंतर तिने दोन लाख रुपये देवून वाद मिटवून टाका असे सांगितले होते. त्यानुसार योगेश २६ सप्टेंबर रोजी दीड लाख रुपये घेवून अमळनेर येथे आला होता. योगेश हा माधुरी हिच्या घरी पोहचला की नाही हे विचारण्यासाठी योगेशची आई मंगलाबाई यांनी माधुरी हिची आई अमृता उदेवाल यांच्याशी फोनवर संपर्क केला असता, त्यांनी तुमचा मुलगा जीवंत येणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर रात्री १ वाजता योगेशचा भाऊ महेश याच्या मोबाईलवर फोन करून योगेश याने माधुरी हिला दोन गोळया तर स्वताला एक गोळी मारली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर योगेशच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी अमळनेर येथे धाव घेतली असता त्याला धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने तो बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. गंभीर जखमी असल्याने योगेश याला मुंबई येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतांना ७ रोजी त्याचा मृत्यू झाला होता.बॅटरी स्फोटाचा बनावयुवतीच्या कुटुंबियांनी बॅटरीचा स्फोट झाल्याचा बनाव करून आमची मुलगीही जखमी झाल्याचे सांगितले होते. .मुंबईमध्ये उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. दरम्यान, योगेश जखमी असतांना व मयत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी वारंवार अमळनेर पोलीसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. उलट पोलीसांनी योगेश याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता.सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशयोगेशच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. त्यांनी अमळनेर पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. तरी देखील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आल्याने योगेशच्या कुटुंबियांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. सुनावणीअंती न्या.टी.व्ही नलावडे व न्या.मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने माधुरी योगेश कुमावत, अमृता उदेवाल, बळवंत उदेवाल, नंदीनी उदेवाल, गिरीष उदेवाल, महेश कुमावत, रेणुका कुमावत या सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पत्रकार परिषदेला मयत योगेशची आई मंगलाबाई कुमावत, मावशी भारती कुमावत, मावसे ज्ञानेश्वर कुमावत, समाजअध्यक्ष संजय बेलदार, महेंद्र बोरसे उपस्थित होते.नातेवाईक आज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेले आहेत. त्यांची फिर्याद घेऊन संशयित लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला जात आहे. -अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक, अमळनेर

टॅग्स :Jalgaonजळगाव