शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

देवतांच्या नावाने शोषण करणाऱ्यांना आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 3:58 PM

‘देवदेवतांच्या नावाने शोषण करणाºया व्यवस्थेला आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणे होय.’

ठळक मुद्देअमळनेर येथे प्रेरणादीप व्याख्यानमालेत अविनाश पाटील‘मंतरलेली अंधश्रद्धा’ या विषयावर गुंफले तिसरे पुष्प

अमळनेर, जि.जळगाव : ‘देवदेवतांच्या नावाने शोषण करणाºया व्यवस्थेला आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणे होय,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.येथील जी.एस.हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या प्रेरणादीप व्याख्यानमालेत ‘मंतरलेली अंधश्रद्धा’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्मिता वाघ व जी.एस.हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडा, सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंचचे संस्थापक सदस्य डी.ए.धनगर, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे आदी विचारमंचवर उपस्थित होते.अविनाश पाटील पुढे म्हणाले, मंतरलेली अंधश्रद्धा म्हणजे मंत्र मारलेली किंवा भारावलेली, एखाद्या गोष्टीने प्रभावित केलेली श्रद्धा होय. श्रध्दा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करता आली तर तो विश्वास होतो, तर अंधश्रद्धा निर्र्मूलन करणे म्हणजे आधुनिक विचारांनी जगणे शिकणे होय. माणसाचा विवेक उन्नत करते ती 'श्रद्धा' व विवेक अवनत करते ती अंधश्रद्धा होय. काल्पनिक गोष्टीचं अधिष्ठान देऊन सामान्यांचं शोषण करण्याला आमचा विरोध आहे. अनुकरणातून अंधश्रद्धा बळावत असते. त्यात महिलांच्या अंधश्रद्धा ह्या पराकोटीच्या असतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रातही मंतरलेली अंधश्रद्धा आहे.अंधश्रद्धेत धर्माची जोड दिली जाते तर अंधश्रद्धा निर्मूलनात धर्माला स्थान नाही. म्हणून जनमानसातील अंधश्रद्धेला तिलांजली दिली पाहिजे.मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वक्त्यांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात उत्कृष्ट शाळा म्हणून विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे प्राचार्य एस.यु.पाटील, चंद्रकांत पाटील, विजयसिंग पवार, वसुंधरा लांडगे, प्रा.विलास पाटील, प्रा.रवींद्र माळी, रवींद्र पाटील, हेमकांत लोहार, डॉ.शरद पाटील यांचा समावेश होता.प्रास्ताविक डी.ए.धनगर यांनी केले. वक्त्यांंचा परिचय विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर