चाळीसगाव भाजपाच्यावतीने रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST2021-08-25T04:22:40+5:302021-08-25T04:22:40+5:30
भारतीय जनता पक्षाच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदा अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी ५:३० वा. छत्रपती शिवाजी ...

चाळीसगाव भाजपाच्यावतीने रास्ता रोको
भारतीय जनता पक्षाच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदा अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी ५:३० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, सरचिटणीस धनंजय मांडोळे, शहर सरचिटणीस अमोल नानकर, युवा मोर्चा अध्यक्ष भावेश कोठावदे यांनी मनोगतातून आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. या आंदोलनात भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सरचिटणीस योगेश खंडेलवाल, अमोल चव्हाण, न. पा. गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, जि. प. सदस्य अनिल गायकवाड, सदानंद चौधरी, कैलास चव्हाण, निवृत्त कवडे, धर्मराज बच्छे, ज्ञानेश्वर बागुल, आयास पठाण, तुषार बोतरे, संदीप पाटील, रणजित पाटील, दिपकसिंग राजपूत, संदिप गवळी, सोमनाथ चौधरी, राकेश बोरसे, डाॅ. रविंद्र मराठे, सुनिल पवार, डी. एस. माळे, प्रल्हाद महाजन, विजय पाटील, मनोज गोसावी, राम पाटील, विशाल सरदारसिग पाटील, सिध्दांत पाटील, जगदीश चव्हाण, नीलेश जाधव, आदित्य महाजन, विवेक चौधरी, प्रभाकर चौधरी, सचिन आव्हाड उपस्थित होते.