डिझेल घ्यायला जाणाऱ्या तरुणाला उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST2021-04-20T04:16:08+5:302021-04-20T04:16:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ट्रॅक्टरसाठी डिझेल घेण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या मयूर नरहरी खाचणे (वय १९, रा. बेलवाय ता. जळगाव) ...

Blew up a young man going to get diesel | डिझेल घ्यायला जाणाऱ्या तरुणाला उडविले

डिझेल घ्यायला जाणाऱ्या तरुणाला उडविले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ट्रॅक्टरसाठी डिझेल घेण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या मयूर नरहरी खाचणे (वय १९, रा. बेलवाय ता. जळगाव) या तरुणाला अज्ञात वाहनाने उडविले. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी झाला. याप्रकरणी सोमवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर खाचणे हा तरुण हातमजुरी करून कुटुंबाला हातभार लावायचा. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरसाठी डिझेल घ्यायला तो दुचाकीने नशिराबाद येथे येत असताना मन्यारखेडा आणि नशिराबाद दरम्यानच्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात मयूर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मयूरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताच्या पश्चात आई सुरेखा, भाऊ राकेश व वडील नरहरी खाचणे असा परिवार आहे. वैद्यकीय अधिकारी विकास गायसमुद्रे यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र इंधाटे करीत आहे.

Web Title: Blew up a young man going to get diesel