सेनेने फेकलेल्या कोंबडीला भाजपचा आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:29+5:302021-08-25T04:21:29+5:30
जीएम फाउंडेशनला बंदोबस्त शहरातील शिवतीर्थ मैदानासमोरील जीएम फाउंडेशनच्या कार्यालयासमोर दुपारी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भाजप कार्यालयावरील गोंधळानंतर या ...

सेनेने फेकलेल्या कोंबडीला भाजपचा आसरा
जीएम फाउंडेशनला बंदोबस्त
शहरातील शिवतीर्थ मैदानासमोरील जीएम फाउंडेशनच्या कार्यालयासमोर दुपारी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भाजप कार्यालयावरील गोंधळानंतर या ठिकाणी हा बंदोबस्त लावण्यात आला होता.
कोट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भाजप कार्यालयात आलो होतो. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीरपणे माफी मागावी. - गुलाबराव वाघ, सहसंपर्क प्रमुख
टीकेला टीकेने उत्तर द्यायला पाहिजे; मात्र शिवसेनेने जो प्रकार केला, तो अत्यंत निषेधार्ह आहे. ही शिवसेनेची संस्कृती नव्हे. शिवसैनिक स्वतःला वाघ समजतात तर त्यांनी कोंबड्या आणायला नको होत्या. तर वाघ आणायला हवे होते. त्यांनी महिलांना पुढे केले. त्यामुळे त्यांनी बांगड्या भराव्यात. या आंदोलनाला पोलिसांचे संरक्षण होते. तरीदेखील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. शिवसैनिक भाजप कार्यालयात घुसेपर्यंत पोलिसांनी मज्जाव का केला नाही? -दीपक सूर्यवंशी, महानगराध्यक्ष भाजप.