शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात?, भाजपच्या 'या' खासदाराने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 15:20 IST

भाजप खासदाराच्या वक्तव्याने खळबळ.

प्रशांत भदाणेएकनाथ शिंदे रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांना संबोधित करत असतानाचा एक व्हिडिओ काल समोर आला होता. यात त्यांनी एक महाशक्ती आपल्या पाठिशी आहे असं विधान केलं होतं. ही महाशक्ती नेमकी कोणती? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. दरम्यान, भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी राज्यात पुन्हा आपली सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

सगळ्यांना सूरत, गुवाहाटी आणि नंतर मुंबई आपली सत्ता आता येणार आहे. आपल्याला महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या दृष्टीनं पुढे न्यायचं आहे. आषाढीला पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हातूनच पूजा होईल, असं वक्तव्य उन्मेष पाटील यांनी केलं. खासदार उन्मेष पाटील यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने जळगावात त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात मनोगत व्यक्त करतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. खासदार उन्मेष पाटलांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय भूकंपाच्या मागे भाजपचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांसोबत सुरतमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज पण दिसून आले होते, त्यानंतर आता खासदार उन्मेष पाटलांनी जाहीर कार्यक्रमात आपलं सरकार येतंय, अशा प्रकारचे वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोरांना भाजप साथ देत असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकशाहीत संख्याबळाला महत्त्व - एकनाथ शिंदे"आज सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्यात काही निर्णय घेतले जातील. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आमदारांचं निलंबन करण्याचा अधिकारच अल्पमतात असलेल्या गटाला नाही. अल्पमतात असलेल्यानं असा निर्णय घेता येत नाही. बैठकीला अनुपस्थित राहिलो नाही म्हणून आमदारी रद्द केली तर देशातील हे पहिलं उदाहरण ठरेल. कायद्यानुसार सर्व गोष्टी चालत असतात. लोकशाहीत आकडे आणि संख्याबळाला महत्व असतं", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा