राज्य सरकारच्या विरोधात भाजपतर्फे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:06 IST2020-02-25T13:05:48+5:302020-02-25T13:06:20+5:30
जोरदार घोषणाबाजी

राज्य सरकारच्या विरोधात भाजपतर्फे धरणे आंदोलन
जळगाव : राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे २५ रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यास सुरुवात झाली असून यामध्ये जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या.
भाजपचा विश्वासघात करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला असून सरसकट कर्जमाफीची घोषणाही हवेत विरल्याने शेतकºयांचा सातबारा अद्यापही कोरा झाला नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.