शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जळगावमध्ये आज मुक्कामी येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 18:01 IST

मंगळवारी वसंत-स्मृति या भाजप कार्यालयाला बावनकुळे भेट देतील.

कुंदन पाटील

जळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी रात्री येथे मुक्कामी येणार आहे. मंगळवारी ते विविध बैठका घेणार असून काही शाखांचे उद्‌घाटन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी दिली. बावनकुळे हे सोमवारी दिवसभर जळगावात बैठका घेणार होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. तर बावनकुळे हे सोमवारी सकाळी नगरहून येणार होते. मात्र दौऱ्यात बदल झाल्याने आता ते सोमवारी सायंकाळी जळगावात येणार आहे.

मंगळवारी वसंत-स्मृति या भाजप कार्यालयाला बावनकुळे भेट देतील. त्यानंतर काही जणांच्या ते खासगी भेटीही घेणार आहेत. तर त्यांच्या उपस्थितीत काही जणांचा पक्षप्रवेशही होणार आहे. दरम्यान बावनकुळे हे भाजप कार्यकर्त्याकडे मुक्कामाला थांबणार आहेत. ते नेमके कुणाकडे थांबणार, याविषयी मात्र माहिती देण्यात आलेली नाही. तर अन्य पदाधिकारी शासकीय विश्रामगृहावर थांबतील, असे भोळे यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाJalgaonजळगाव