शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबराव पाटलांच्या घरासमोर 'भाजयुमो'नं काढली निषेधाची रांगोळी; विद्यापीठ सुधारणा कायद्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 11:16 IST

महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून तीव्र विरोध होत असून, सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास थेट पालकमंत्र्यांच्या घरासमोरच आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले.

जळगाव- महाविकास आघाडी सरकारने पारित केलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाला भारतीय जनता युवा मोर्चानं तीव्र विरोध केला आहे. या विधेयकाचा आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री 1 वाजता चक्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानासमोर निषेधाची रांगोळी काढली. तसेच पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासमोर देखील रांगोळी काढत विद्यापीठ कायद्यांविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून तीव्र विरोध होत असून, सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास थेट पालकमंत्र्यांच्या घरासमोरच आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून, या आंदोलनात भारतीय जनता मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे, भाऊसाहेब पाटील, सचिन पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. रात्री १२.३० वाजता पाळधी येथील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ कायद्याच्या विरोधातील पेंटिंग काढली. तसेच संपर्क कार्यालयासमोर विद्यापीठ कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पालकमंत्र्यांचा निवासस्थानासमोर जाऊन त्या ठिकाणी देखील काळी रांगोळी काढण्यात आली.

भाजयुमो विरूद्ध युवासेनेचा वाद पेटणार?  विद्यापीठ कायद्यावरून सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष व भारतीय जनता पार्टी यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता भारतीय जनता युवा मोर्चाने थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात जाऊन यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करत शिवसेना व युवासेनेला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. या आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर देखील शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर जाऊन कोंबड्या फेकून आंदोलन केले होते. त्याला उत्तर देत भाजपने देखील शहरात आंदोलन केले होते. आता या आंदोलनानंतर पुन्हा भाजप विरुद्ध सेना वाद तापण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलBJPभाजपा