शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

भाजप-सेनेत बदलली नेतृत्वाची कूस; युती झाली भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 6:00 AM

जळगाव जिल्ह्यातील चित्र; गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या मैत्रीचे रंग खुलणार

चुडामण बोरसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात नेतृत्वाची कूस बदलली आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन तर शिवसेनेमध्ये सुरेशदादा जैन यांच्याऐवजी गुलाबराव पाटील यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘युती’ भक्कम राहिल्याने विधानसभेत तोच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. जळगावसह एक-दोन जागांवर कुरबुरी वाढल्या तरी पक्षश्रेष्ठी मार्ग काढतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव हे मतदार संघ भाजपकडे तर जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि चोपडा हे तीन मतदार संघ शिवसेनेकडे तर अमळनेर अपक्ष आणि राष्टÑवादी काँग्रेसकडे एकमेव एरंडोल मतदार संघ आहे.विधानसभेसाठी अनेक इच्छुक आहेत. युती होईल की नाही, याबाबत अनेक तर्क लढविले जात आहेत. युती झाली तरी अडचणी आहेत. युतीतच जास्त बंडखोरीची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व सेना स्वतंत्र लढले होते. त्यामुळे सन २००९ मध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्याठिकाणी सन २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप हे मतदार संघ आता युती झाल्यास सहजासहजी सोडेल, अशी शक्यता कमीच आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर जळगाव आणि भुसावळ मतदार संघाचे घेता येईल. गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी जाहीर करुन खळबळ माजविली आहे. पूर्वीच्या जळगाव मतदार संघातून सुरेशदादा जैन हे नऊ वेळा निवडून आले आहेत. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. पण त्यावेळी ते शहरात नसल्याने प्रचारात सहभागी होऊ शकले नव्हते. यावेळी ते स्वत: शहरात आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन हे सांगतील त्यालाच विधानसभेचे तिकिट मिळेल आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ते घेतील, हे निश्नित. जामनेरात तर अनेक प्रतिस्पर्धी त्यांनी भाजपात आणले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात विरोध असा राहिलेला नाही.मुक्ताईनगर मतदार संघातून एकनाथ खडसे यांनाही कुणी आव्हान देईल, अशी स्थिती नाही. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवाराने त्यांना जोरदार टक्कर दिली होती. पण मध्यंतरीच्या काळात विरोधक ढेपाळले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा खडसे यांना सहज होईल, अशी स्थिती आहे.जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादीची अवस्था बिकट आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही. तर २००९ च्या निवडणुकीत ५ आमदार निवडून आलेल्या राष्टÑवादीला २०१४ मध्ये जेमतेम एक जागा मिळाली. राष्टÑवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आहे ती जागा टिकविण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे.वंचित बहुजन आघाडीही आक्रमकपणे पुढे येत आहे. आघाडीचे पॉकेट्स असलेल्या भुसावळ व रावेरमधून त्यांनी तयारी सुरू केली आहे. वंचित काँग्रेस आघाडीसोबत गेल्यास त्यांना कुठली जागा सोडायची हा ही एक प्रश्नच राहील.

चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील खासदार झाल्याने ही जागा रिक्त आहे. त्यामुळे युतीच्यावतीने येथे सर्वात जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे पर्यायाने बंडखोरीची भीती इथेच जास्त आहे. यातून भाजपला दगाफटका होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे इच्छुकांना सांभाळताना युतीला मोठीच कसरत करावी लागणार आहे.भाजप, राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षच नाहीसध्याच्या स्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अजूनही कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सध्या तरी जिल्हाध्यक्ष नाहीत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा