शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

भाजपला करून दिली जातेय आश्वासनांची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 12:17 PM

जळगाव : दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शहराचा चेहरा-मोहरा बदलवून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन देत मनपात ...

जळगाव : दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शहराचा चेहरा-मोहरा बदलवून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन देत मनपात सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांना त्यांनीच दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची लागलेली वाट, दोन दिवसाआड भल्या पहाटे होणारा पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या, डास, भटके कुत्रे, मोकाट गुरांचा त्रास अशा विविध समस्यांबाबत सर्वसामान्य जळगावकरांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची आठवण जळगावकरांकडून करून दिली जात आहे.निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आश्वासनांचे व्हिडीओ, वृत्तपत्रीय कात्रणे, जाहिरनाम्याची प्रत सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात जळगावकरांना व्हिडीओव्दारे दाखविलेले विकासाच्या स्वप्नांचे भाषण, जळगावकरांनी पुन्हा आपल्या स्टोअरमधून शोधून काढले आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीच्या काळात भाजपला सत्ता द्या, एका वर्षातच जळगावचा चेहरा-मोहरा बदलवून दाखवू असे आश्वासन जळगावकरांना दिले होते. आता महाजन यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली जात आहे. एवढेच नाही तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश भोळे यांनी प्रचारासाठी ‘चीड येते का खड्ड्यांची’ हे घोषवाक्य वापरून जळगावकरांची मते घेतली होती. मात्र, जळगाव शहरातील रस्त्यांची सध्याची स्थिती पाहता, आता जळगावकर याच घोषवाक्यांची आठवण आमदार भोळेंना करून देत आहेत.फडणवीसांकडून आश्वासनांचा पाऊसजळगाव शहराच्या विकास आराखडा तयार असून, त्यानुसार एमआयडीसीचा विस्तार, समांतर रस्त्यांचा प्रश्न, चौकांचे सौंदर्यीकरण करून, व्यापारी गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावणार. हुडको व जिल्हाबॅँकेचे कर्जावर सकारात्मक निर्णय घेवू, जळगाव शहरातील वाढीव क्षेत्रातील भागाचा विकास करण्यात येईल. जळगावचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरु करू, जळगाव शहराला सुंदर, सुरक्षित आणि स्मार्ट बनवून दाखवू , विकास हाच आपल्यादृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. वर्षांनुवर्ष विकासापासून वंचित असलेल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देवून, त्यांचे जीवन सुखकर करण्याचा भाजपचा प्रयत्न राहिल अशी आश्वासने तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात व्हिडीओव्दारे केलेल्या आवाहनात जळगावकरांनी दिली होती. केवळ कर्जाचा मुद्दा मार्गी लागला, इतर आश्वासने हवेत विरली आहेत.गिरीश महाजन यांनी दिलेले आश्वासन-जळगावकरांनी सुरेशदादा जैन यांना ३० वर्षे दिली. आम्हाला काही वर्षे द्या, एका वर्षाच्या आत जळगाव शहराचा सर्वांगिण विकास करून, शहराचा चेहरा-मोहरा बदलवून दाखवू.-केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. जळगाव मनपात देखील भाजपची सत्ता आली तर केंद्र व राज्याकडून शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही.-रस्ते, उड्डाणपूल, व्यापारी गाळ्यांचा प्रश्न, समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येतील. सत्ता आल्यानंतर महिनाभराच्या आतच १०० कोटींचा निधी जळगाव शहरासाठी राज्यसरकारकडून आणू व शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न करू, जळगावकरांनी भाजपला सत्तेची केवळ एक संधी द्यावी असे गिरीश महाजन यांनी मनपा निवडणुकीच्या काळात जळगावकरांना आश्वासन दिले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव