समित्यांसाठी भाजपमध्ये ओढाताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:16 IST2020-01-25T12:16:28+5:302020-01-25T12:16:42+5:30
जळगाव : येत्या मंगळवारी २८ रोजी विषय समित्यांच्या वाटपासाठी विशेष सभा बोलविण्यात आलेली आहे, मात्र, यावरून भाजपच्या सभापतींमध्ये ओढाताण ...

समित्यांसाठी भाजपमध्ये ओढाताण
जळगाव : येत्या मंगळवारी २८ रोजी विषय समित्यांच्या वाटपासाठी विशेष सभा बोलविण्यात आलेली आहे, मात्र, यावरून भाजपच्या सभापतींमध्ये ओढाताण सुरू असल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे मंगळवारी नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़
सभापती निवडीच्या अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर विषय समित्यांचे वाटप होणार आहे़ यात महिला बालकल्याण व समाजकल्याण सभापती म्हणून आधीच ज्योती पाटील व जयपाल बोदडे यांची निवड झालेली आहे़ उर्वरित शिक्षण, आरोग्य, अर्थ, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या वाटपासाठी ही सभा होणार आहे़ दरम्यान, विषय समिती एक मधून निवडलेले रवींद्र पाटील यांनी आधीच शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून पदभार स्वीकारला आहे़ पक्षात असेच ठरले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे़ दुसरीकडे उज्ज्वला माळके या आरोग्य सभापतीपदासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे़